राफेल विमानांच्या खरेदीत घोटाळा ; मोदींचे हितसंबंध – राहुल गांधी

नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा: राफेल विमान खरेदीत खूप मोठा घोटाळा झाला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी वैयक्तिकरित्या रस घेऊन विशेष प्रयत्न केले, असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.

Loading...

देशात पहिल्यांदाच असे घडत आहे की, एखादा संरक्षणमंत्री लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी किती पैसे खर्च झाले, हे सांगायला नकार देत आहे. हा पायंडा चांगला नाही. मी गुजरात निवडणुकांच्यावेळीच राफेल विमानांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचे सांगितले होते. मोदींनी या व्यवहारात विशेष रस घेऊन वैयक्तिकरित्या प्रयत्न केले आहेत. त्यासाठी मोदी पॅरिसलाही जाऊन आले. त्यावेळी मोदींनी परस्पर करारातील अटी-शर्तींमध्ये बदल केला, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यानंतर आता संरक्षणमंत्री या कराराची माहिती द्यायला नकार देत आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना ही माहिती जाणून घेण्याचा हक्क आहे. तरीही संरक्षणमंत्री नकार देतात, याचा अर्थ या खरेदीत घोटाळा झाला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

दरम्यान, केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी सोमवारी राफेल विमान खरेदीविषयी संसदेत स्पष्टीकरण दिले होते. यावेळी त्यांनी भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय करारानुसार या व्यवहाराचे तपशील उघड करता येणार नाही, असे सांगितले होते.Loading…


Loading…

Loading...