कांचन कुल यांच्या फायद्यासाठीच पुण्याची पाणी कपात

टीम महाराष्ट्र देशा: पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांना फायदा होण्यासाठीच कालव्यातून पाणी सोडले गेले. शहरावर पाणी कपातीचे संकट असताना कालव्यातून पाणी सोडण्याचे पाप पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, पुणे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी बापटांवर कडाडून टीका केली आहे.

पावसाळ्यात पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे भरली होती, मात्र पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले नाही, त्यामुळे शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईला गिरीश बापट हेच जबाबदार आहेत, दौंड, इंदापूरला पाणी सोडण्यासाठी बापट यांनी प्रशासनावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप मोहन जोशी यांनी केला.

Loading...

पुणे शहराला मागील तीन वर्षापासून उन्हाळ्यात पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या केवळ ६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणी 15 जुलैपर्यंत पुरवावं लागणार आहे.यामध्येच देखभाल दुरुस्तीसाठी आज रोजी संपूर्ण शहरातील पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर 3 मे रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
'आता फक्त अपेक्षा एवढीचं की, जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका’