पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा

अमरावती : पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये शहर काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी सायकल चालवून केंद्र सरकारचा निषेध केला. अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या बैलगाडी मोर्चात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

मागील सात महिन्याच्या काळात केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दारात ७ ते ८ रुपयांनी दरवाढ केली आहे. जी सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर हे कमी असूनही पेट्रोलचे दार मात्र कमी करण्यात आले नसल्याने केंद्र सरकार जनतेची लूट करीत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसतर्फे करण्यात आला.