औरंगाबाद: महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या विरोधात आज (दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या काळात मनमोहनसिंग पंतप्रधान असताना दरवाढीवर भाजपच्या फायद्यासाठी ट्विट करणारे हे सिनेसितारे आज पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात गप्प का असा प्रश्न आंदोलकांनी विचारत जोरदार घोषणाबाजी केली.
अमिताभ बच्चन व अक्षय कुमार हे भाजपचे प्रचारक आहेत, अशी घोषणा करत विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर , पेट्रोल दरवाढीवर व बाकी जनतेच्या हितासाठीसुद्धा अमिताभ व अक्षयने ट्विट करावे. एकेकाळी लोकांच्या भावनांनसोबत खेळण्यासाठी भाजप सिनेसिताऱ्यांना ट्विट करण्यासाठी पैसे पुरवण्याचे काम करत असे.
या सिताऱ्यांना सुद्धा कुठल्यातरी पक्षाकडून पैसे मिळतात त्यासाठी त्यांची चौकशी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच अमिताभ बच्चन व अक्षय कुमार जर खरे देशभक्त असतील तर त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व जनतेसाठी यावं असे मत आंदोलकांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आमिर शेख यांच्या सूचनेवर हे आंदोलन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्यासाठी बोर्ड अनुकूल !
- कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता शाळा सक्तीने बंद
- ‘काँग्रेसमुळे वाण नाही, पण गुण लागला ; म्हणून राम मंदिराचा चंदा आठवला’
- पुण्यात ‘अभाविप’ने उधळली विद्यापीठाच्या ‘मॅनेजमेंट कौन्सिल’ची बैठक
- उसाच्या उभ्या ट्रॉलीला दुचाकीची धडक, दोघांचा जागीच मृत्यू