fbpx

पिकविमा प्रश्नावरून कॉंग्रेस आक्रमक ; हे सरकार शेतकऱ्यांचे की विमा कंपन्यांचे ?

टीम महाराष्ट्र देशा : पिकविमा प्रश्नावरून कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. हे सरकार नक्की शेतकऱ्यांचे आहे की विमा कंपन्यांचे? असा सवाल कॉंग्रेसने उपस्थित केला आहे.

आगामी विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान महाराष्ट्र कॉंग्रेसने पिकविमा प्रश्नावरून राज्य सरकावर निशाणा साधला.

पीक विम्याची भरपाई देताना पावसाचे प्रमाण हे निकष होते. यापुढे मात्र पावसाचा किती दिवस खंड पडला यावरुन भरपाई दिली जाणार आहे. असे महाराष्ट्र कॉंग्रेसने म्हंटले. इत्केह्क नव्हे तर शासनाच्या नव्या निकषांमुळे पुन्हा एकदा विमा कंपन्याच मालामाल होणार असून बळीराजाच्या पदरी काहीच पडणार नाही.

हे सरकार नक्की शेतकऱ्यांचे आहे की विमा कंपन्यांचे? असा सवालही कॉंग्रेसने केला. तसेच हे सरकार निकृष्ट दर्जाची तुरडाळ विकत असल्याचा आरोपही त्यांनी केला.