पुण्याच्या सनबर्न विरोधात आता काँग्रेस मैदानात

पुणे : सनबर्न फेस्टिव्हल हा सांस्कृतिक आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करायचा असल्यास आमचा विरोध नाही ,पण त्यांना पायघड्या घालण्यासाठी डोंगर फोडून पर्यावरणाचे अपरिमित नुकसान करण्यास काँग्रेस पर्यावरण विभागाचा ठाम विरोध आहे . संवैधानिक मार्गाने आंदोलन करून या डोंगरफोडीविरोधात ,कारवाईसाठी महसूल विभागाचे आदेश मिळवले असल्याची माहिती आज पुणे श्रमिक पत्रकार संघात दिली .

bagdure

कारवाईसाठी बारकाईने पाठपुरावा चालू असून या डोंगरफोडीविरुद्ध सनबर्न फेस्टीव्हल मध्ये आंदोलन करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला .

पत्रकार परिषदेत काँग्रेस च्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे ,प्रदेश सरचिटणीस पराग आठवले ,प्रदेश सरचिटणीस अमर नाणेकर, जिल्हा पर्यावरण विभागाचे अध्यक्ष गिरीश खाटपे ,अस्लम शेख (पर्यावरण विभाग ,जिल्हा उपाध्यक्ष )यांनी शासकीय अनागोंदी आणि पर्यावरणविषयक अनास्थेचा पर्दाफाश केला . महसूल विभागाचे कारवाईचे आदेश मिळवल्याचे कागद सादर केले.

You might also like
Comments
Loading...