कॉंग्रेस कार्यकर्ते गडकरींसोबत; नाना पटोलेंची उडाली झोप?

Union Minister Nitin Gadkari

टीम महाराष्ट्र देशा – नागपूरमध्ये तुम्हीच जिंकणार आहात. आम्हाला खात्री आहे. आम्ही काँग्रेसचा प्रचार करत असलो आमचा तुम्हाला मनापासून पाठिंबा आहे. हे काँग्रेस कार्यकर्तेच मला सांगत आहेत, असं नितीन गडकरी म्हणाले. नागपुरातील एका जाहीर प्रचारभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक वक्तव्य केलं आहे.

नितीन गडकरी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नागपूर लोकसभा मतदारसंघातून गडकरीं विरोधात उभे असलेले काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची झोप उडण्याची शक्यता आहे. तसेच गडकरींच्या या वक्तव्यामागे काँग्रेसमधील गटबाजी कारणीभूत असल्याची चर्चा आहे.