fbpx

कॉंग्रेसच्या आरोपांना लश्कर –ए-तोयबाचे समर्थन

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दीक तीव्र युद्धाला तोंड फुटलंय. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी एक आरोप केला की दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत दहशतवादी कमी आणि सामान्य नागरीक जास्त मारले गेले. आझाद यांच्या या विधानानंतर लश्कर –ए-तोयबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. या दहशतवादी संघटनेच्या प्रवक्त्याने लगेच एक प्रसिद्धीपत्रक काढून आझाद यांचे आरोप अगदी बरोबर असल्याचं म्हटलं आहे.

गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. “दहशतवादी संस्था लष्कर ए तय्यबा काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांच्या मताशी सहमती दर्शवते तर दुसरे काँग्रेसचे नेते सोझ म्हणतात की काश्मिरींना स्वतंत्र व्हायचंय. याचा अर्थ भारताबाहेर एक पाकिस्तान आहे आणि काँग्रेसमध्ये एक पाकिस्तान आहे,” संबित पात्रा यांनी ट्विट केलंय.