fbpx

‘बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेणाऱ्या कॉंग्रेसच्या तोंडी मानवाधिकाराच्या गप्पा शोभत नाहीत’

टीम महाराष्ट्र देशा- मानवाधिकाराच्या गप्पा मारणाऱ्या कॉंग्रेसने आरसा पहावा. बाळासाहेबांचं नागरिकत्व काँग्रेसवाल्यांनी रद्द केलं होतं,तसेच बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेणाऱ्या कॉंग्रेसच्या तोंडी मानवाधिकाराच्या गप्पा शोभत नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर तोफ डागली. महायुतीचे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ औसा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मोदींनी जोरदार फटकेबाजी केली.

मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे-

  • आई तुळजाभवानी आणि सिद्धेश्वर महाराज, शिवाचार्य महाराजांच्या पुण्यभूमीला माझा साष्टांग नमस्कार : नरेंद्र मोदी
  • जम्मू काश्मीरमध्ये आम्ही राष्ट्रवाद्यांच्या मनात सकारात्मकता जागविली : नरेंद्र मोदी
  • आतंकवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये घुसून मारणार, ही नव्या भारताची नीती आहे. : नरेंद्र मोदी
  • बाळासाहेबांचं नागरिकत्व काँग्रेसवाल्यांनी रद्द केलं होतं : नरेंद्र मोदी
  • राजकारण एकीकडे, मात्र ज्यांना वेगळा पंतप्रधान हवा, अशा नेत्यांसोबत शरद पवार तुम्ही उभं राहणं शोभा देत नाही : नरेंद्र मोदी
  • शरद पवार तुम्ही अशा लोकांसोबत उभे आहात, तुम्हाला हे शोभत का? राजकारण वेगळी गोष्ट मात्र शरद पवार तिकडं शोभत नाहीत : नरेंद्र मोदी
  • ज्या लोकांना आपल्याच सैनिकांवर विश्वास नाही, त्यांना शिक्षा द्यायला हवी : नरेंद्र मोदी