राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ नंतर आता राज्यात काँग्रेसची ‘जनसंघर्ष’ यात्रा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकार विरोधात राज्यभरात काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेनंतर आता, आघाडीमधील मुख्यपक्ष असणाऱ्या काँग्रेसकडून जनसंघर्ष यात्रेच आयोजन करण्यात आलं आहे. 31 ऑगस्टपासून कोल्हापूरमधून जनसंघर्ष यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा अशोक चव्हाण यांनी दिली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मोदी सरकारच्या चार वर्षाच्या कार्यकाळात देशभरात केवळ घोषणांंचा पाऊस पडला आहे. मात्र, एकही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही, त्यामुळे जनतेचा विश्वासघात झाला असल्याचा आरोप यावेळी अशोक चव्हाण यांनी केला.

भाजपच्या सत्ताकाळात लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे लोकांपर्यंत जाऊन आजची वस्तुस्थिती सांगणं गरजेचं आहे, त्यामुळे काँग्रेसकडून जनसंघर्ष यात्रेच आयोजन करण्यात आले असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर