चौकीदार शोधायचा असेल तर नेपाळला जाईल, पण आम्हाला पंतप्रधान हवाय – हार्दिक पटेल

hardik patel

टीम महाराष्ट्र देशा: चौकीदार शोधायचा असेल तर नेपाळला जाईल, आज देशाची अर्थव्यवस्था सुधारणारा प्रधानमंत्री आम्हाला हवा आहे, अशी टीका कॉंग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे, गुजरातमध्ये अनेक ठिकाणी सभा घेत त्यांनी मोदी – शहा जोडीवर टीका केली आहे. आज मतदान पार पडताना देखील भाजपवर टीका करण्याची संधी हार्दिक पटेलने सोडली नाही.

देशाची अर्थव्यवस्था, युवकांना नौकरी, शिक्षण, रोजगार देणारा प्रधानमंत्री देशाला हवा आहे, त्यामुळे मला चौकीदार नाही तर प्रधानमंत्री हवा आहे, चौकीदार शोधायचा असेल तर नेपाळला जाईल, असा घणाघात हार्दिक पटेल यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रातील १४ जागांसह देशातील ११७ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे, लोकशाहीच्या उत्सवात देशातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांच्यासह डझनभर दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे.Loading…
Loading...