खास कार्टून प्रसिद्ध करत ‘अमूल’ कडून विराट-अनुष्काला शुभेच्छा

virushka

ऑस्ट्रेलिया : भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या पहिल्या बाळाची देखील जोरदार चर्चा सुरु आहेत. अनुष्काने ११ जानेवारीला मुंबईत मुलीला जन्म दिला. तेव्हापासून चाहत्यांमध्ये त्यांच्या या पहिल्या मुलीची चर्चा होताना दिसून येत आहे. तसेच विराट आणि अनुष्काला अनेक सेलिब्रेटिंनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

याबरोबरच आता अमुलने देखील त्यांच्या मुलीच्या जन्मानिमित्त एक कार्टून प्रसिद्ध केले आहे. विराट आणि अनुष्का पाळण्यात असलेल्या बाळाला खेळवत असल्याचे हे कार्टून आहे. तसेच त्यात लिहिले आहे की ‘या डिलेव्हरीने त्रिफळाचीत केले. घरी स्वागत आहे. अमुल हे ताज्या घडामोडींच्या विविध विषयांवर कार्टुन बनवत असतात. त्यामुळे यावेळी त्यांनी विराट आणि अनुष्काच्या बाळाच्या जन्माबद्दल कार्टुन काढले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नव्या पाहुण्याच आगमन झालं आहे. विराटने सोशल मीडियामार्फत सर्वांना ही गोड बातमी सांगितली. ‘आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की,आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे’ असं आवाहन देखील त्याने केलं होत.

दरम्यान, अनुष्काने एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की, ‘विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.’

महत्वाच्या बातम्या