राहुल गांधींनी केलं गडकरींचं अभिनंदन

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावर बोलताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आरक्षण मिळाले तरी नोकऱ्या आहेत कुठे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी यावर आपलं मत व्यक्त केल होत. यावर उत्कृष्ट प्रश्न विचारलात असं ट्विट करत राहुल गांधींनी गडकरींचं अभिनंदन करत सणसणीत टोला मारला आणि उत्कृष्ट प्रश्न विचारला असं मत व्यक्त केलं.

नितीन गडकरी यांनी आरक्षण नोकरी देईल याची शाश्वती नाही कारण नोकऱ्या कमी होत चालल्या असल्याचं म्हटलं होतं. ‘समजा आरक्षण दिलं, तरी नोकऱ्या आहेत कुठे ? बँकेत आयटी तंत्रज्ञानाचा वापर वाढला असल्याने नोकऱ्या नाहीत. सरकारी नोकरभरती बंद आहे. नोकऱ्या आहेतच कुठे ?’ असं नितीन गडकरींनी म्हटलं होतं.

त्यांच्या याच वक्तव्याला प्रतिउत्तर देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘उत्कृष्ट प्रश्न विचारलात गडकरीजी. प्रत्येक भारतीय हाच प्रश्न विचारत आहे’, असं ट्विट करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे काँग्रेस पक्षाने ट्विटरच्या माध्यमातून नितीन गडकरींना सत्य बोलणारे पहिले भाजपा मंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केल.
आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालत आहेत, अशी पाठराखण करत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षण आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये, असेही सांगितले होते.

डोंबिवली माझ्या पाहणीतलं सगळ्यात घाणेरड शहर – नितीन गडकरी