विरोधकांनी केले गोगावलें यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे अभिनंदन

पुणे: महापालिकेतील सत्तेचं एक वर्ष वाया गेल्याच वक्तव्य खुद्द भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी केले होते. गोगावले यांच्या वक्तव्यानंतर स्वपक्षीयासह विरोधकांकडून देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. दरम्यान, आज महापालिका सभागृहामध्ये गोगावले यांच्या याच वक्तव्याच अभिनंदन करत सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी मांडला, शिंदे यांच्या तहकुबीच्या प्रस्तावाला इतर विरोधकांनी देखील अनुमोदन दिले.

पुणे महापालिकेतील भाजपच्या सत्तेला १५ मार्च रोजी एकवर्ष पूर्ण झाली आहेत. एका कार्यक्रमात बोलत असताना भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ‘महापालिकेतील सत्तेच एक वर्ष वाया’ गेल्याचे विधान केले होते. गोगावले यांच्या वक्तव्याने विरोधकांनादेखील भाजपवर टीका करण्याचा आयताच मुद्दा मिळाला आहे. अरविंद शिंदे यांनी याच विधानाचा आधार घेत महापालिका सभागृहात तहकुबी मांडली मात्र टेक्निकल मुद्दा उपस्थित करत ती फेटाळण्यात आली.

दरम्यान, गोगावले यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगितले आहे. मी असे वक्तव्य केलेचं नसून काही लोकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. असे गोगावले म्हणाले.