‘गिरीश बापट’ खरे बोलल्याबद्दल त्यांचे अभिनंदन; पृथ्वीराज चव्हाण

prithviraj 11

पुणे: गिरीश बापट यांनी डाळींब उत्पादकांच्या मेळाव्यात धक्कादायक विधान करून भाजप सरकारला घरचा आहेर दिला होता. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी संधी साधत  गिरीश बापट यांच्यावर टीका टिप्पणी सुरु केली आहे.

‘पुढील वर्षी सरकार बदललेले असेल’, अशी भविष्यवाणी करीत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचे खरे बोलल्याबद्दल अभिनंदन केले पाहिजे, अशी टिप्पणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. डाळींब उत्पादकांच्या मेळाव्यात ‘तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या आत्ताच सांगा. पुढील वर्षी सरकार बदललेले असेल’, असे विधान बापट यांनी नुकतेच केले होते. बापट यांनी सत्य बोलण्याचे धाडस दाखविले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे चव्हाण म्हणाले. ते महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद असलेल्या ‘डॉयलॉग अँड डायलेक्टिक-अ सेक्युलर परस्पेक्टिव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

Loading...

अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या दोनदिवसीय वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय डाळिंब परिसंवादाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाले त्यावेळी ‘राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही. डिसेंबरपर्यंत आपले सरकार आहे. पुढे कोणते सरकार येईल हे सांगू शकत नाही. यावर मी जास्त बोलणार नाही. डाळिंब संघाने काय हवंय ते आताच मागून घ्यावे,’असे धक्कादायक वक्तव्य करून पालकमंत्री गिरीश बापट यांनी फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरीश बापट यांचे अभिनंदन केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार