हे यश तुमच्या कठोर परिश्रमांचे, देशसेवेच्या विचारांवरील निष्ठेचे फळ – अजित पवार

ajit pawar

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2019 चे निकाल जाहीर केले आहेत. प्रदीप सिंह देशात अव्वल आला, तर जतीन किशोर देशात दुसरा आहे. प्रतिभा वर्मा देशात तिसरी, तर महिला उमेदवारांमध्ये प्रथम आली आहे.

यूपीएससीने सप्टेंबर 2019 मध्ये घेतलेल्या लेखी आणि फेब्रुवारी ते ऑगस्ट 2020 मध्ये घेतलेल्या मुलाखती किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीच्या निकालाच्या आधारे निकाल जाहीर केला. उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर घोषित केली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. 2019 मध्ये प्रथमच सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत राबवल्या गेलेल्या ‘ईडब्ल्यूएस कोटा’ (आर्थिकदृष्ट्या मागास) अंतर्गत 78 उमेदवारांची निवड झाली आहे. तर 11 उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

‘महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही’

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळालेले यश हे तुमच्या कठोर परिश्रमांचे, देशसेवेच्या विचारांवरील निष्ठेचे फळ आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना यापुढच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कल्याण आणि व्यापक देशहित लक्षात घेऊनच आपण निर्णय घ्याल, असा मला विश्वास आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंतच्या या प्रवासात तुम्हाला साथ दिलेल्या गुरुजनांचे, पालकांचे, मार्गदर्शकांचे, मित्रांचे, हितचिंतकांचेही मी यानिमित्ताने अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

शासकीय कामकाजात मराठी भाषा वापरातील त्रुटी तात्काळ दूर करा