आपल्या यशाने मराठी झेंडा फडकविणाऱ्या यशस्वींचे मनःपूर्वक अभिनंदन – उद्धव ठाकरे

udhav Thackeray

बीड : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2019 चे निकाल जाहीर केले आहेत. प्रदीप सिंह देशात अव्वल आला, तर जतीन किशोर देशात दुसरा आहे. प्रतिभा वर्मा देशात तिसरी, तर महिला उमेदवारांमध्ये प्रथम आली आहे.

यूपीएससीने सप्टेंबर 2019 मध्ये घेतलेल्या लेखी आणि फेब्रुवारी ते ऑगस्ट 2020 मध्ये घेतलेल्या मुलाखती किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीच्या निकालाच्या आधारे निकाल जाहीर केला. उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर घोषित केली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. 2019 मध्ये प्रथमच सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत राबवल्या गेलेल्या ‘ईडब्ल्यूएस कोटा’ (आर्थिकदृष्ट्या मागास) अंतर्गत 78 उमेदवारांची निवड झाली आहे. तर 11 उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

सुशांतच्या दु:खद मृत्यूचं राजकारण करू नका;रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीसांना झापलं

केंद्रीय लोकसेवा आय़ोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या राज्यातील उमेदवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. या यशस्वींनी राज्य आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवली आहे, ही बाब राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करून ते या संधीचेही सोने करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, आपल्या यशाने मराठी झेंडा फडकविणाऱ्या यशस्वींचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या कष्टाने स्वप्नाला गवसणी घातलीच आहे. आता तुम्ही आपला समाज, राज्य आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवली आहे, त्याचाही अभिमान आहे. या संधीचे तुम्ही निश्चित सोने कराल, असा विश्वास वाटतो. या वाटचालीत तुमच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या आई-वडील, पालक यांच्यासह गुरूजन, मार्गदर्शकांचेही अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

आठवीत असताना पाकिटात चिठ्ठी लिहून ठेवली, पठ्ठ्याने पहिल्याच दणक्यात कलेक्टर बनवून दाखवले