अभिनंदन : सीबीएससी परीक्षेत 600 पैकी 600 गुण मिळवत दिव्यांशीने रचला विक्रम

Divyanshi

लखनौ – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईचे निकाल 15 जुलैपूर्वी जाहीर होऊ शकतात अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी (13 जुलै) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये लखनौची कन्या दिव्यांश जैन हिने 600 पैकी 600 गुण मिळवत इतिहास रचला आहे.

दिव्यांशीला हायस्कुलमध्ये 97.6 टक्के गुण मिळाले आहेत. नवयुग रेसिडेन्सची विद्यार्थीनी असलेल्या दिव्यांशीच्या या दैपिप्यमान यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सीबीएससीच्या बोर्ड परीक्षेत असं ऐतिहासिक यश मिळेल, पैकीच्या पैकी मार्क मिळतील, असे स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र, मी वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास केला होता. सातत्याने मी अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं होतं, विशेष म्हणजे मी स्वअभ्यासाला प्राधान्य दिलं, रिव्हीजनही केलं होतं, असे दिव्यांशीने म्हटले आहे.

दिव्यांशीचे वडिल राकेश जैन यांचे लखनौमध्ये दुकान असून आई सीमा जैन या गृहिणी आहेत. दहावीमध्ये दिव्यांशाला ९७.६ टक्के गुण मिळाले होते.

दिव्यांशी जैनचे हे आहे प्रगती पुस्तक :
इंग्लिश- 100, संस्कृत- 100, इतिहास- 100, भूगोल- 100, इश्योरेंस- 100, इकोनॉमिक्स- 100.

CBSE बोर्डाच्या बारावीचा निकाल पाहण्यासाठी :

cbseresults.nic.in
cbse.nic.in
results.nic.in

सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळावर जा…

होमपेजवर CBSE बोर्ड रिजल्ट 2020 लिंक दिसेल त्यावर क्लीक करा.

तुमचा बैठक क्रमांक टाकून संबधित माहिती भरा

सबमिट बटन क्लीक केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

बच्चन यांना केलं आइसोलेशन वार्डात शिफ्ट, उत्तम प्रकृतीसाठी मध्य प्रदेशात पूजा

‘आयसीएसई’चा दहावी, बारावीचा निकाल जाहीर

जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये दहशतवाद्याचा खात्मा