सांगलीमध्ये काँग्रेस आघाडीची विजयाकडे घोडदौड

टीम महाराष्ट्र देशा – सांगलीमध्ये काँग्रेस आघाडीची विजयाकडे घोडदौड सुरु असून,आघाडीचे २८ उमेदवार आघाडीवर तर भाजपचे १२ उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे. सांगलीमध्ये शिवसेनेचे २ उमेदवार विजयी झाले आहेत.

दुसऱ्या बाजूला,जळगावात भाजपने मुसंडी मारली असून,सत्तास्थापनेकडे भाजपची वाटचाल सुरु आहे,शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जळगावमध्ये भाजप तब्बल ५७ जागांवर आघाडीवर आहे. जळगाव महानगरपालिकेवर भाजपाचे कमळ फुलणार की शिवसेनेचा भगवा फडकणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मनपाच्या 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात असून या सर्व उमेदवारांचा भाग्याचा आज फैसला होणार आहे.

७ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा … सकल मराठा मोर्चाकडून सरकारला अल्टिमेटम

You might also like
Comments
Loading...