एक कोटींचा फरक?; केंद्र सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतनिधीचा गोंधळ

पुणे : महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मिळाली असल्याचे पोस्टर शहरांमध्ये झळकत आहेत. माजी मंत्री आणि भाजपचे नेते गिरीष महाजन आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडून हे पोस्टर लावण्यात आले आहेत. मात्र या दोन्ही पोस्टरवर दाखवण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीच्या आकड्यात थोडी ना थिडकी तब्बल 1 कोटी रुपयांचा फरक दिसून येत आहे. यावरुन मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

एक कोटी रुपयांचा फरक दिसतोय, चला सारे मिळून शोधूया. कारण हा पैसा कुणीही दिला असेल तर जनतेकडून कररूपी गोळा केलेला आहे, असं म्हणत रुपाली पाटील यांनी केंद्र सरकारच्या मदतीबाबत शंका व्यक्त केली आहे. रुपाली पाटील यांनी केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या या मदतनिधीमधील ताफावत दाखवण्यासाठी दोन्ही पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

भाजपकडू लावण्यात आलेल्या एका बॅनरवर पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 701 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर दुसऱ्या बॅनरवर 700 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांना या नेमका मदत निधी किती जाहीर झाला आहे?, असा प्रश्न पडला आहे.

महत्वाच्या बातम्या :