fbpx

तिढा सुटेना,अहमदनगरच्या बदल्यात औरंगाबादची जागा?

टीम महाराष्ट्र देशा- अहमदनगरच्या बदल्यात औरंगाबादची जागा अदलाबदली करत आघाडीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  काँग्रेसने औरंगाबादच्या बदल्यात नगरची जागा देण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी औरंगाबादच्या जागेसाठी आग्रही असून डॉ. सुजय विखे पाटलांची राष्ट्रवादीत जाण्याची मानसिकता नसल्याची चर्चा आहे. दरम्यान यापूर्वी आपण कोणत्याही परीस्ठीत्मध्ये ही निवडणूक लढविणार असल्याचं डॉ. सुजय विखे पाटलांनी जाहीर केलं आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून आपण काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र, पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी, आपण ही निवडणूक लढणार आहोत. माझे वडील काँग्रेसचे नेते आणि आई काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद अध्यक्षा असल्या तरी, मला माझा पक्ष निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. असे वक्तव्य युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकतेच केले होते.