वादग्रस्त वक्तव्यामुळे गोंधळ, राहुल गांधींनी केला अखेर उद्धव ठाकरे यांना फोन

Rahul Gandhi Uddhav Thackeray

नवी दिल्ली : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येविषयी भूमिका मांडली. मात्र ही भूमिका मांडत असताना गांधी यांनी महाराष्ट्र कॉग्रेसच्या अधिकारांबाबत केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

राहुल गांधी म्हणाले, कोरोनाचा प्रसार दाट वसाहत असलेल्या ठिकाणी जास्त होत असल्यामुळेच मुंबई आणि दिल्लीतील रुग्ण संख्या जास्त आहे. आम्ही महाराष्ट्रातील सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पण मोठे निर्णय घेण्याएवढे अधिकार काँग्रेसला नाही. आमच्याकडे पंजाब, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे.

दरम्यान, आज राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आहे. ‘कोरोना लढाईमध्ये आम्ही आपल्यासोबत आहे. राज्यात कोरोना कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करु’, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या या संवादामुळे महाविकास आघाडीत काहीसं तणावाचं बनलेलं वातावरण निवळण्याची चिन्हं आहेत.

राहुल गांधींचे ते वक्तव्य योग्यच, महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार नाही, तर…

राहुल गांधी म्हणाले की, ‘कोरोनाची राज्यातली स्थिती गंभीर आहे. दाट वस्ती आणि प्रचंड मोठ्या लोकसंख्येमुळे महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडली आहे. राज्य सरकार त्यांचं काम करत आहे. काँग्रेस राज्यात सत्तेत असली तरी मोठे निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. पंजाब, छत्तिसगड आणि राज्यस्थानमध्ये आम्ही तातडीने निर्णय घेऊ शकतो. पण महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे.’केंद्र सरकारने राज्य सरकारला आणखी मदत केली पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान,काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ‘राज्यात काँग्रेसचं नाही तर शिवसेनेचं सरकार आहे’, असं वक्तव्य केलं होतं. तर दुसरीकडे माजी खासदार संजय निरुपम यांनी कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला देवून टाकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कॉंग्रेसची कुचंबना होत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

फडणवीसांनी महाराष्ट्राच्या बाबतीत ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहू नये – नितीन राऊत

कोरोनाच्या कचाट्यात अवकाळी पावसाचे संकट, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या !