हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष समितीचे उजनी धरणात जलसमाधी आंदोलन

ujani

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टी.एम.सी. पाणी इंदापूरला नेले असून या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील स्वाक्षरी झाली आहे. इंदापूरकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यात धडकल्या आणि याच निर्णयाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली.

उजनीच्या पाण्यावरुन आज महाराष्ट्र दिनी उजनी जलाशयात पोलिसांना चकवा देत शिवसेनेच्या संजय बाबा कोकाटे यांनी जलसमाधी आंदोलन केलं.  पाच टीएमसी सांडपाणी उजनी धरणातून इंदापूर तालुक्यात देण्याचा निर्णय झाला. यानंतर सोलापूर जिल्ह्यातून याला प्रचंड विरोध सुरु झाला असून सर्वपक्षीय नेत्यांनी यास विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

उजनी संघर्ष समितीसह अनेक संघटनांनी आज उजनी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.टेंभुर्णी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी शनिवारी पहाटे पासूनच शिराळ टे, सुरली, उजनी टे, भिमानगर या गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरी देखील छुप्या मार्गाने मिळेल त्या वाटेने शेतकरी उजनी धरण जलाशयाकडे आले. यानंतर शिवसेनेचे संजय बाबा कोकाटे यांनी आज पोलिसांना चकवा देत उजनी जलाशयात कार्यकर्त्यांसह जलसमाधी आंदोलन केलं.

महत्त्वाच्या बातम्या