राजस्थानात संघर्ष : गेहलोत म्हणतात इतिहास भाजपला माफ करणार नाही

ashok gehlot vs sachin

जयपूर – राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशा आशयाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. पण आपण काही झाले तरी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सचिन पायलट यांनी सांगितले आहे.

भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांची सचिन पायलट भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण एनडीटीव्हीशी बोलताना हे वृत्त सचिन पायलट यांनी फेटाळून लावले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली आहे. काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचं संकट उभं राहण्याची चिन्ह असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्हिप जारी करत काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शंभरहून अधिक आमदार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर आमदार बसने बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी ऑल इज वेल अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, या बैठकीत गेहलोत यांच्या पाठिंब्याचा ठराव संमत करण्यात आला. यावेळी बोलताना अशोक गेहलोत म्हणाले,"जेव्हा ते (भाजपा) लोकशाही पद्धतीनं निवडणुका जिंकू शकत नाही. तेव्हा ते ईडी, सीबीआय आणि इतर यंत्रणा घेऊन येतात. यासाठी इतिहास त्यांना कधीही माफ करणार नाही," अशी टीका गेहलोत यांनी भाजपावर केली.

महत्वाच्या बातम्या-

रायुडूला ‘या’ देशानं दिली नागरिकत्वाची अन् क्रिकेट खेळण्याची ऑफर

शेतकरी बांधवांना चिंतामुक्त व समृध्द करण्यासाठी शासन कटिबध्द – दादा भुसे

..तर पुढच्या निवडणुका एकत्र लढवू, शरद पवारांचे संकेत

अशोक गेहलोत यांच्या अडचणी सुरुच,निकटवर्तीय उद्योगपतींच्या घरावर आयकर विभागाचे छापे