नितीश कुमारांचा स्वाभिमान : केंद्रात मंत्रिपद नाही तर बिहारमध्ये भाजपलाही मंत्रिपद देणार नाही

टीम महाराष्ट्र देशा :  मोदी सरकारने केंद्रात जदयूला एकही मंत्रीपद न दिल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे बिहार सरकारमध्ये भाजपला एकही मंत्रिपद देणार नसल्याचे समोर आले आहे. नितीश कुमार यांनी बिहार सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराचे प्रयोजनही केले आहे.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, निवडणुकीत भाजपा आणि जदयुने खांद्याला खांदा लावून काम केले. त्यामुळे जदयुला केंद्रात एक तरी स्थान मिळेल याची अपेक्षा होती, मात्र जदयुला केंद्रात एकही स्थान न मिळाल्याने जदयु भाजपवर नाराज झाल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, या मंत्रिमंडळात जदयूच्या कोट्यातून सात जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे, बऱ्याच काळापासून हा विस्तार रखडला होता. परंतु बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अचानक मंत्रिमंडळ विस्ताराचे प्रयोजन केले आहे. जदयूला केंद्रात एकही स्थान न दिल्याने जदयु नाराज झाल्याचे दिसत आहे. तसेच मोदी सरकारने केंद्रात जदयूला एकही मंत्रीपद न दिल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे बिहार सरकारमध्ये भाजपला एकही मंत्रिपद देणार नसल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, भाजपाच्या कोट्यातून आधीच मंत्री बनविण्यात आले आहेत. जी खाती रिकामी आहेत ती जदयूची आहेत, असे स्पष्टीकरणही जदयूने दिले आहे. इतकेच नव्हे तर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून विस्ताराबाबत कळविले आहे. राजभवनात सकाळी ११.३० वाजता हा शपथविधी होणार आहे. मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळात जदयू सहभागी न झाल्याने बिहारमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.