राणे साईड इफेक्ट्स : जठारांची राणे हटाव ची हाक तर कुडाळकरांनी ठोकला थेट पक्षाला रामराम

टीम महाराष्ट्र देशा : भाजपच्या कोट्यातून खासदार झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची खासदारपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली आहे.पनवेलमध्ये झालेल्या पक्षाच्या विभागीय बैठकीत सरोजिनी पांडे यांच्याकडे आपण तशी मागणी केली असल्याचे प्रमोद जठार यांनी स्पष्ट केलं आहे.

तर दुसऱ्या बाजूला राणेंना भाजपने दिलेल्या मानाच्या पानामुळे भाजपनेत्यांची सिंधुदुर्गात घुसमट होऊ लागल्याची चर्चा आहे. राणे कुटुंबियांच्या वाढत्या प्रस्थामुळे अस्वस्थ असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जात होते. २०१४ च्या निवडणुकीदरम्यान नितेश राणे यांच्याशी वाद झाल्याने, काका कुडाळकर आणि माजी आमदार राजन तेली यांनी एकाच वेळी राणेंपासून फारकत घेतली होती. मात्र सध्या भाजपमध्ये असलेल्या कुडाळकरांनी काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ पाहून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी मुंबईत गांधी भवन येथे काका कुडाळकर काँग्रेसवासी होणार आहेत.