नवनित राणांना मदत करणाऱ्या गद्दार गुढेंना मातोश्रीवर थारा देवू नका,अडसूळांंची मागणी

टीम महाराष्ट्र देशा- अमरावतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार आनंद अडसूळ यांचा पराभव झाला होता आता या पराभवाचे साईड इफेक्ट दिसू लागले आहे. माजी खासदार अनंत गुढे यांना आज मातोश्रीवर बोलवण्यात आल्याची चर्चा असल्यानं अडसूळ गट नाराज झाला आहे.

दरम्यान, आता अनंत गुढे आणि शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांच्यात कलगीतुरा रंगला असून गुढे यांनी लोकसभा निवडणूकीत विद्यमान खासदार नवनित राणा यांना मदत केल्याचा आरोप करत गद्दार गुढे यांना मातोश्रीवर थारा देवू नका अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजीत अडसूळ यांनी केली आहे.

गुढे यांनी लोकसभा निवडणूकीत विद्यमान खासदार नवनित राणा यांना मदत केली. या गद्दारांना पक्षातून बाहेर फेकले जावे अशी मागणी अभिजित यांनी केली आहे. आनंदराव अडसूळ कसे नालायक आहेत, कसे वाईट आहेत हेच अनंत गुढे यांनी पेरले. गेल्या पाच वर्षात गुढेंनी आनंदरावांबद्दल विषाची पेरणी केली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.