‘अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात संघर्ष पूर्वापारपासून; आता तर विषय पैशांचा…’

ajit pawar and jayant patil

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हा आढावा बैठक पार पडली आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कथित नाराजी प्रकरणावर भाष्य केलं आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जयंत पाटील हे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर संतापल्याच वृत्त काही वाहिन्यांनी दिलं होतं.

यावरून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचं देखील काल बोललं जात होतं. यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडल्याच्या चर्चा होत्या. याप्रकरणी आता अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

‘मी नाराजी स्पष्टपणे तोंडावर सांगतो. मला कोणत्या अधिकाऱ्याला बोलायचं झालं तर त्याला बाजूला घेऊन नाराजी सांगेन. जर विषय माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल तर तेच उत्तर देतील. परंतु जयंत पाटील सीनियर नेते आहेत. जयंत पाटील यांनी अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे,’ असं अजित पवार म्हणाले.

यावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या या दोन्ही दिग्गज नेत्यांवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. ‘मनाची नाहीच, पण जनाची तरी…जनता उघड्यावर येऊ दे, अन्नान्न होऊ दे, नाही तर औषधांविना मरू दे. पण अजित पवार आणि जयंत पाटील हे त्यांच्यातील पूर्वापारपासूनचा संघर्ष मात्र सोडणार नाही. आता तर विषय पैशांचा आहे…,’ असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP