संसदेत अविश्वास ठराव : शिवसेना तटस्थ ; चर्चांना पूर्णविराम

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारविरोधात संसदेत शुक्रवारी अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहेत.

आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलगू देसम आक्रमक झाला आहे. भाजपविरोधात तेलुगु देसमनं अविश्वास प्रस्ताव आणलाय. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून अविश्वास प्रस्तावाची नोटीस देण्यात आली, जी लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारली.

या अविश्वास ठरावावर शिवसेना नक्की काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र आता लोकसभेत मतदानावेळी शिवसेना तटस्थ भूमिका घेणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांना तशा सूचना केल्याचं देखील संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

 

 

‘चाणक्य असेही म्हणाला होता’ ; संजय राऊतांचा अमित शहांना टोला

विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान ; मुंडे बंधू – भगिनीची प्रतिष्ठा पणाला