संसदेत अविश्वास ठराव : चर्चेसाठी सात तासांची वेळ राखीव

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारविरोधात संसदेत शुक्रवारी अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहेत.

आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलगू देसम आक्रमक झाला आहे. भाजपविरोधात तेलुगु देसमनं अविश्वास प्रस्ताव आणलाय. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून अविश्वास प्रस्तावाची नोटीस देण्यात आली, जी लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी यावर चर्चा आणि मतदानासाठी शुक्रवारची वेळ दिली होती.

लोकसभेचं कामकाज सकाळी अकरा वाजता सुरु होईल. सभागृहात प्रश्नोत्तराचा काळ होणार नाही आणि लंचही नसेल. अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी सात तासांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या वतीने पाच मोठे नेते आणि मंत्री चर्चेत सहभाग घेतील.

कोणत्या पक्षाला किती वेळ?

भाजप- 3 तास 33 मिनिट
काँग्रेस- 38 मिनिट
AIADMK- 29 मिनिट
टीएमसी- 27 मिनिट
बीजेडी- 15 मिनिट
शिवसेना- 14 मिनिट
टीआरएस- 9 मिनिट
टीडीपी- 13 मिनिट
सीपीआयएम- 7 मिनिट
एनसीपी- 6 मिनिट
एसपी- 6 मिनिट
एलजेएसपी- 5 मिनिट
शिरोमणी अकाली दल, आरएलएसपी, एडी- 12 मिनिट
इतर – 26 मिनिट

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याच्या तयारीत ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी परवडले पण …

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...