लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सवलत द्या- आ. संग्राम जगताप

मुंबई : कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना लसीकरणात वाढ करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यात आता १८ ते  ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरणही सुरू झाले आहे. मात्र, अशा व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय लस मिळत नाही. मात्र, यातील अनेक गरीब कुटुंबांकडे स्मार्ट-फोन उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.

या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी वरील मागणी केली आहे. १८-४४ वयोगटातील बहुतांश व्यक्ती गरीब कुटुंबातील असून ऑनलाईन नोंदणीकरता लागणारा स्मार्ट फोन नसल्याने नोंदणीपासून ते वंचित राहतात. त्यामुळे केंद्राने घालून दिलेल्या लसीकरणाच्या नियमावलीत सुधारणा करून लोकांना लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सवलत द्यावी असे मत त्यांनी मांडले आहे.

केंद्र सरकारच्या वतीने १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारशी या बाबत चर्चा करण्याची विनंती देखील आमदार जगताप यांनी आपल्या पत्रात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पत्र सार्वजनिक करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या