‘एसटी’चे प्रशिक्षण पूर्ण मात्र सेवेत घेण्यास टाळाटाळ; उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण!

औरंगाबाद : कोरोनापूर्वी एसटी महामंडळाने परीक्षा घेऊन अनेकांना भरती केले होते. प्रशिक्षण कालावधी पूर्ण होऊनही अजूनही या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. काही जणांचे प्रशिक्षण मार्च महिन्यात पुर्ण झाले, तर काही जणांचे जून महिन्यात पुर्ण झालेले आहे. प्रशिक्षण पुर्ण करूनही नोकरीवर घेतले जात नाही. यामुळे काही उमेदवारांनी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर मंगळवारी (दि. २७) आंदोलन केले.

औरंगाबादसह जिल्ह्यातील बीड, परभणी, अहमदनगर येथून एसटीत निवड होऊन प्रशिक्षण कालावधी पुर्ण करण्यात आलेल्या एसटीच्या भावी कर्मचार्‍यांनी औरंगाबाद विभाग नियंत्रक कार्यालय गाठून मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आंदोलन केले. नोकरीच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी काही तरूणांनी गेल्या वर्षभरापासून वेटींगवर असल्याचे सांगितले.

एसटी प्रशासनाने सेवापुर्व प्रशिक्षण सुरू केले होते. मार्च महिन्यात यातील काही उमेदवारांच्या प्रशिक्षण पूर्ण केलेले आहेत. तर काही उमेदवारांचे प्रशिक्षण जुन मध्ये संपलेले आहे. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतरही आतापर्यंत एसटी सेवेत घेण्याची कोणतीही कारवाई केलेली नाही. जालना आणि जळगाव सह राज्यातील अन्य भागात नोकरी भरतीसाठी संबंधीत उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले आहे. यामुळे औरंगाबादचीही नोकरी भरती प्रक्रियेला वेग वाढवून लवकरात लवकर वाहक चालक पदावर नियुक्ती देण्याची मागणी करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या