राज्यातील 4175 अपूर्ण पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण

Babanrao-Lonikar
मुंबई, दि. ७ : राज्यातील 4175 अपूर्ण पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वछता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधान सभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
सदस्य डॉ. अशोक उईके यांनी करळगाव येथील पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. लोणीकर म्हणाले, करळगाव जि. यवतमाळ येथी पाणीपुरवठा योजनेचे काम 40 टक्के झाले आहे. उर्वरित काम मार्च अखेर पूर्ण करण्यात येईल. राज्यात 4175 पाणी पुरवठ्याच्या योजना अपूर्ण होत्या. त्या संदर्भात विभागीय बैठका घेऊन पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे 5121 गावांना फायदा झाला आहे. तीन वर्षात या कामांसाठी 2749 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
यावेळी सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, सत्यजित पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.