‘संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची प्रलंबित कामे पूर्ण करा’, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

ajit pawar

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी समृद्धी महामार्गावर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही निर्देश दिले आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम रेंगाळणार नाही यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर असलेल्या प्रलंबित बाबी पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तर मराठवाड्यातील महामार्गांच्या स्थितीविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रश्न मांडले आहेत. तसेच गडचिरोलीतील सिरोंचा-आलापल्ली महामार्गाच्या दुरूस्तीची मागणी मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान या बैठकीत राज्यातील रस्ते प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.