शंभर कोटी रुपयांच्या निधीतून झालेले रस्ते निकृष्ट, अतुल सावे यांची तक्रार

औरंगाबाद : शासनाने दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून महापालिकेने ३१ रस्त्यांची कामे केली आहेत. मात्र ही कामे निकृष्ट झाल्याची तक्रार भाजपचे आमदार अतुल सावे यांनी शासनाकडे केली आहे. त्यानुसार नगर विकास विभागाने रस्त्यांसंदर्भात सविस्तर अहवाल पाठविण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी दिला होता.

त्यातून ३१ रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र सुरवातीस कोणती रस्ते यादीत घ्यायची यावरून शिवसेना व भाजपमध्ये वाद लागला. त्यानंतर निविदा प्रक्रियेवरून कंत्राटदारांमध्ये वाद लागला. त्यामुळे तब्बल दोन वर्षे या रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नव्हती. या निधीतील काही रस्त्यांची कामे सुरू आहेत.

दरम्यान शंभर कोटीतील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची तक्रार भाजपचे आमदार अतुल सावे यांनी शासनाकडे केली होती. त्याची दखल घेत नगरविकास विभागाने महापालिकेला वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे आदेश दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या