ईव्हीएमची पूजा करणाऱ्या श्रीपाद छिंदमच्या भावाविरूध्द गुन्हा दाखल

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमच्या भावाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदमने मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएमची पूजा केली होती. या प्रकरणी श्रीकांत छिंदमसह आणखी 8 जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

श्रीकांत छिंदमविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. श्रीकांत छिंदमने काल अहमदनगर महापालिकेच्या मतदानादरम्यान ईव्हीएमची विधीवत पूजा केली होती. वादग्रस्त श्रीपाद छिंदम हा वॉर्ड क्रमांक 9 मध्ये अपक्ष उमेदवार आहे. मात्र त्याला तडीपार करण्यात आले आहे. याच वॉर्ड क्रमांक 9 मध्ये असलेल्या मतदान केंद्रात श्रीपादचा भाऊ श्रीकांतने पूजा केली होती.

Loading...

यामुळे अहमदनगरमध्ये चर्चेला उधाण आले होते. यावर बोलताना हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे असं म्हणून भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी या प्रश्नाला बगल दिली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले