अभिनेता आदित्य पांचोलीने केला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर बलात्कार?

टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीने अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. ई-मेलद्वारे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु अभिनेता आदित्य पांचोलीने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.

अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वतीने तिच्या बहिणीने वर्सोवा पोलीस ठाण्यात ई-मेलद्वारे बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणानंतर एका वृत्तवाहिनीने आदित्य पांचोलीशी संवाद साधला त्यावेळी, या सर्व आरोपांचं खंडन केले. हे प्रकरण १३ वर्षापूर्वीचं आहे. त्यावेळी माझे आणि संबधित अभिनेत्रीचे चांगले संबध होते. असे आदित्य पांचोली यांनी म्हंटले.

Loading...

याचबरोबर, आपल्याला फसवलं जात आहे. ही अभिनेत्री विविध चॅनेल्सवर माझ्यावर गंभीर आरोप करत होती. मात्र ते आरोप मान्य नसल्याने मी या अभिनेत्रीविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. दाखल केलेल्या मानहानीची तक्रार मागे घेण्यासाठी या अभिनेत्रीने तिचे वकील रिजवान सिद्दीकींना ६ जानेवारी २०१९ ला भेटीसाठी आपल्या घरी पाठवल होतं. मात्र मी तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने मला संबंधीत अभिनेत्रीने बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती. असेही त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर रिजवान सिद्दीकीमार्फत तिने माझ्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता. असा आरोपही त्यांनी केला.

इतकेच नव्हे तर, आणि संबधित अभिनेत्रीचे वकील रिजवान सिद्दीकी आणि माझ्यात झालेल्या चर्चेचं मी स्टिंग ऑपरेशन केलं आहे. या स्टिंग ऑपरेशनचा १८ मिनिटांचा व्हिडीओ काढला असून तो व्हिडियो वर्सोवा पोलीस स्टेशन, पोलीस उपायुक्त आणि अंधेरी मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट यांना सोपवला आहे. आणि त्या व्हिडीओची सत्यताही पडताळण्यात आलेली आहे. असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, एबीपी माझा या वृत्तवाहिनीने घेतलेल्या अभिनेता आदित्य पांचोली यांच्याशी साधलेल्या संवादा नंतर, संबधित अभिनेत्रीचे वकील रिजवान सिद्दीकी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु रिजवान सिद्दीकी कुठलीही प्रतिक्रिया देत नसल्याचे समोर आले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'