खड्ड्यांमुळे जखमी झालेल्या व्यक्तीची थेट गडकरींकडे तक्रार; कंपनीविरोधात कारवाई

नागपूर : खराब आणि निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे अनेक लोक गंभीर जखमी होतात तर काहीना आपला जीव गमवावा लागतो. एका राष्ट्रीय महामार्गावर खोदलेल्या खड्ड्यांमुळे अपघात झाला यामध्ये एका कार मालकाचा अपघात झाला. याबाबत त्या व्यक्तीने थेट नितीन गडकरींकडे तक्रार केली. आणि या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात आली.

बैतूलच्या आमलामध्ये राहणारे वकील राजेन्द्र उपाध्याय हे त्यांच्या आईवर उपचार करण्यासाठी नागपूरहून घरी परतत होते. तेव्हा हिवरा गावाच्या जवळ रस्ता खराब असल्याने त्यांची कार उलटली. यामध्ये ते आणि त्यांची आई दोघेही जखमी झाली. उपाध्याय यांनी याची तक्रार चिचौली पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर गडकरींच्या  आदेशावरून NHAI ने ओरिएंटल स्ट्रक्टर इंजिनिअरिंग कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. तर येथील खड्डे देखील दोन तासांत बुझविण्यात आले.

दरम्यान, नागरिक टोल भरत असून देखील अशा रोडवर देखील लोकांना जागोजागी असलेल्या  खड्ड्यांचा सामना करत प्रवास करावा लागतो. रस्ते तयार करताना करोडोंचा भ्रष्टाचार होत आहे. यामुळे रस्त्याचे काम नीट न करता काही वेळातच रस्ते खराब होतात. यामुळे नागरीक देखील हैराण झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या