लखनऊ : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल झाली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना त्यांनी आचार संहितेचा भंग केला अशी तक्रार समाजवादी पक्षाने केली आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश मधील लखनऊ शहरात त्यांच्याविरोधात आदर्श आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने या पाच राज्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याच्या सक्त सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने देशातील पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केली असून काही बंधने लादली आहेत. मात्र उत्तरप्रदेशमध्ये या नियमांची पायमल्ली केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच केल्याचे निदर्शनास आल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
उत्तर प्रदेशमधील कैराना शहरात शनिवारी अमित शहा यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला, यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते. अचारसंहितेदरम्यान १० लोकांनाच परवानगी असते मात्र अमित शहा यांनी शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेत प्रचार केला, असा आरोप सपाने तक्रारीत केला आहे.
महत्वाच्या बातम्या
“संजय राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं आहे की पराभवामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”
‘…म्हणूनच मुंबईत दंगली उसळल्या’; चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल
एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणाला, ‘जय श्री राम’
तुमचं लग्न कधी होणार? म्हणाऱ्या नेटकऱ्यांना सोनाक्षीने दिलं ‘हे’ उत्तर