मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. शिंदे यांना शिवसेनेच्या जवळपास ४६ आमदारांचे समर्थन असल्याचे समजते. हे सर्व आसामच्या गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कोरोना नियमांचा भंग केल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले होते. मात्र असं असताना आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना भेट दिली. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. याचा आधार घेत तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
ऑनलाइन पद्धतीने मलबार हिल पोलिस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. कोरोना नियमांनुसार, कोरोना रुग्णाला कोणालाही भेटता येत नाही. विलगीकरणात राहावे लागते. पण मुख्यमंत्री सर्वांना भेटत असल्याचे दिसले. उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियम मोडले आहेत.
Complaint of Uddhav Thackrey to @MumbaiPolice pic.twitter.com/CtSt0SVcOg
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) June 22, 2022
दरम्यान, राज्यपाल यांच्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.
महत्वाच्या बातम्या :