भाजप प्रदेश उपाध्यक्षांनी राज ठाकरेंविरुद्ध केली पोलिसात तक्रार

सांगली: शिवतीर्थावर समाजात जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यामुळे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला.

राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर राम मंदिराच्या प्रश्नावरून देशात दंगली घडवल्या जातील, असा केंद्रावर खळबळजनक आरोप केंद्रावर केला होता. त्यामुळे देशात हिंदू-मुस्लीम दंगलीची राज ठाकरेंना माहिती असले तर त्यांनी पोलिसांना द्यावी, जातीय दंगलींबाबत केलेले वक्तव्य समाजात जातीय तेढ निर्माण करणारे आहे. असे केळकर म्हणाल्या. त्यांनी
सांगली शहरातील संजयनगर पोलिस ठाण्यात जाऊन राज ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला.

काय म्हणाले होते राज ठाकरे ?

देशात राममंदिराच्या नावाखाली पुन्हा दंगली घडवल्या जातील. कोर्टाचा निकाल आला की दंगली सुरु होतील. राम मंदिर व्हायलाच पाहिजे मलाही ते हवंय. पण निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराच्या नावाखाली दंगली होणार असतील तर मंदिर पुढच्या वर्षी निवडणुकांनंतर झाल्या तरी चालतील.