शिवसैनिक हत्या प्रकरण: अहमदनगरमध्ये 600 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

अहमदनगर: केडगावमध्ये घडलेल्या दोन शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणानंतर आता ६०० शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे हत्याकांडानंतर संतप्त शिवसैनिकांनी दगडफेक, जाळपोळ, रास्तारोको केला होता. त्यामुळे मृतदेहाची अवहेलनाकरणे,सरकारी कामात अडथळा यासह अनेक गंभीर गुन्हे शिवसैनिकांवर दाखल करण्यात आले आहेत.

शनिवारी सायंकाळच्या सुमारास संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप तसेच त्यांचे सासरे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या हत्याकांडानंतर संतप्त शिवसैनिकांनी रास्तारोको केला होता. तसेच पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करत जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे तीन ते चार तास मृतदेह देखील घटनास्थळीच होते.

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह नगरसेवक, शहरप्रमुख पदाधिकाऱ्यांसह तब्बल 600 जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...