‘अब्बाजान’ शब्दप्रयोगानंतर योगींविरुद्ध सीजेएम कोर्टात तक्रार दाखल

yogi

लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या शब्दप्रयोगामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकास्त्रांचा वर्षाव होत असतानाचे चित्र बघायला मिळत आहे. कुशीनगर येथे बोलत असतांना योगिनीं आपल्या भाषणात ‘अब्बाजान’या शब्दाचा उल्लेख केला. हा शब्दप्रयोग त्यांनी एका विशिष्ट समाजाला उद्देशून केला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगींविरुद्ध सोमवारी(१३ सप्टें.)अहियापूर ठाणे परीक्षेत्रातील भीखनपूर गावच्या सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी तक्रार दाखल केली आहे.

एका कार्यक्रमात बोलत असतांना ते म्हणाले की,’अब्बाजान म्हणणारे सर्वजण गरीबांचा राशन हडपायचे. कुशीनगरचा राशन तेव्हा थेट नेपाळ, बांगलादेश पर्यंत पोहोचत होतो. कुशीनगर परिसरात शेती, धर्म आणि श्रद्धा यासाठी ओळखला होता. एकूण चारशे कोटींपेक्षा अधिकच्या योजनांचे लोकार्पण करायचे असल्याचे देखील ते म्हणाले. पुढे ते म्हणले की,’हे लोकार्पण तर नुसता ट्रेलर आहे. अद्याप खूप काही होणे बाकी आहे. भगवान बुद्ध यांना समर्पित मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी देखील जरुर येणार आहे’,असे देखील ते म्हणाले.

दरम्यान, न्यायालयात सुनावणीसाठी ही याचिका घेण्यात आली असून २१ सप्टें. रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी कुशीनगर परिसरात एकूण १२० कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण केले. यादरम्यान, भाषणात अब्बाजान शब्दप्रयोग करत त्यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला. परंतु त्यांच्या या शब्दप्रयोगानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या