‘त्या’ वक्तव्यासाठी भाजप मंत्र्याच्या विरोधात गुन्हा दाखल

पाटणा : भाजप नेते दिवसेंदिवस आपल्या बेताल वक्तव्यांनी पक्षाला अडचणीत आनत आहेत. सीतेचा जन्म टेस्ट ट्युब तंत्रज्ञाने झाल्याचं विधान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केलं होतं. आता यावरून मोठा वाद निर्माण झाला असून, या वक्तव्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढविल्या आहेत. बिहारमधील सीतेची जन्मभूमी असणाऱ्या सीतामढी जिल्ह्यात मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात दिनेश शर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रामायण काळात माता सीतेचा जन्म एका मातीच्या भांड्यात झाला होता. त्यामुळे रामायण काळापासून टेस्ट ट्युब बेबीची पद्धत अस्तित्वात होती. इतक्यावरच न थांबता महाभारत आणि रामायण काळाचा हवाला देत त्यांनी नारदमुनी पत्रकार असल्याचंही म्हटलं होतं.

दरम्यान स्थानिक वकील ठाकूर चंदन सिंह यांनी शनिवारी सकाळी मुख्य न्याय दंडाधिकारी सरोज कुमारी यांच्या कोर्टात आक्षेप पत्र दाखल केलं. ‘दिनेश शर्मा यांनी सीतेवर केलेल्या टिप्पणीमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.या विधानातून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातो आहे, असं त्यांनी आक्षेप पत्रात नमूद केलं आहे.