Aurangabad- मुख्यमंत्र्यांविरोधात पैठण (औरंगाबाद ) पोलिसात तक्रार अर्ज, फसवणूक केल्याचा आरोप

तूर पेरायला लावून फसवणूक केल्याचा आरोप

औरंगाबाद : तूर पेरायला लावून फसवणूक केल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पैठणच्या पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

तूर पेरायला लावून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप अन्नदाता शेतकरी संघटनेने केला आहे.

पणनमंत्री सुभाष देशमुख आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेने केली आहे. पोलिसांनी अन्नदाता शेतकरी संघटनेचा अर्ज स्वीकारला आहे.

 

 

You might also like
Comments
Loading...