सावरकरांचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विरोधात पोलिसात तक्रार

टीम महाराष्ट्र देशा – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबाबत अपमानजनक वक्तव्य केल्या प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींच्या वतीने सिंहगड पोलीस ठाणे पुणे येथे तक्रार करण्यात आली आहे.दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथील नेहरू स्टेडियम मध्ये अल्पसंख्याक परिषदेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जीभ घसरली व त्यांनी सावरकर डरपोक होते. त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

दरम्यान सावरकर प्रेमी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. समाज माध्यमांवरून राहुल गांधी उर्फ पप्पू यांना लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला असून आता परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे, शहराध्यक्ष निर्मल देशपांडे, पदाधिकारी उदय देशपांडे, श्रीपाद कुलकर्णी, दत्तात्रय देशपांडे आदींनी पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.