छगन भुजबळांना पुण्यातील तडफदार भाषण भोवणार; ईडी ,सीबीआयकडे तक्रार

पुणे/सह्याद्री वृत्त सेवा ; तब्बल अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुण्यातील जाहीर सभेत तडफदार भाषण करत मैदान गाजवले. मात्र, या भाषणामुळेच त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसत आहे.आपल्या भाषणातून भुजबळ यांनी केलेलं इडीच्या छाप्यासंदर्भातील वक्तव्य भोवण्याची चिन्हे आहेत.

पुणे शहरामध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० व्या वर्धापन दिन सोहळयात छगन भूजबळांच्या भाषणावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. आपल्या भाषणात भुजबळ यांनी छापा कधी पडणार यासंदर्भात आपल्याला आधीच माहिती मिळत होती असा दावा केला होता .

पुण्यातील एका नागरिकाने त्यांच्या ईडीच्या कारवाई संदर्भातील विधानाविषयी पुणे पोलिसांच्या विशेष शाखेसह सीबीआय आणि ईडीकडे तक्रार दिली आहे. तक्रारदारांच्या वतीने त्यांचे वकील अॅड. अतुल पाटील यांनी दि. १४ जून २०१८ रोजी या संदर्भात तक्रार दिली आहे. दरम्यान, अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याला दूजोरा दिला आहे.

नेमक्या कोणत्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे
कुटुंबातील लहान लहान मुली घाबरायच्या, शेवटी शेवटी ती धाड येणार असं सांगणारा कुणी ना कुणी असतोच आपला तिकडे बसलेला जो हळूच काहीतरी सांगतो,बाबा आज काहीतरी गडबड आहे. मग सगळ्या आमच्या महिलांनी ,मुलांनी त्या लहान मुलींना घेवून कुणाच्या तरी घरी जाऊन बसायचं,मुली घाबरू नयेत म्हणून,किंवा कोणत्या तरी मॉल मध्ये जाऊन … तर अश्या ज्या धाडी ज्या आहेत त्यातून मिळालं काहीच नाही.

जे लोकं भुजबळ यांना धाडी पडण्याआधी आज काहीतरी गडबड होणार आहे हे सांगायचे ते लोकं नेमके कोण हे सर्वांसमोर येणे गरजेचे असल्याचे अतुल पाटील यांनी सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर भुजबळ यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे.

You might also like
Comments
Loading...