Bhaskar Jadhav | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवसेना पक्षाने काही केलं नाही, असं नारायण राणे म्हणतात, मग तू काय म्हशी भादरत होता का? असा खोचक सवाल भास्कर जाधव यांनी केला होता. मात्र, हे वक्तव्य त्यांना अडचणीत आणणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.
भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या विरोधात तक्रार दाखल –
भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या विरोधात कुडळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. “कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्यावर झालेल्या एसीबी कारवाईच्या विरोधात एसीबी कार्यालयावर ठाकरे गटाने मोर्चा काढला होता, सदर मोर्चाच्या वेळी भाजप नेत्यांबद्दल जाणीवपूर्वक खालच्या दर्जाची भाषा वापरून तेढ निर्माण करणारी चिथावणीखोर वक्तव्ये शिवसेना नेते करणार याची पूर्वकल्पना होती, त्यामुळे कालच आम्ही त्यासंबंधी सूचना लेखी तक्रार अर्जाद्वारे दिलेली होती, तरीही आजच्या मोर्चात भाषणे करताना भाजपा नेत्यांविषयी अत्यंत खालच्या दर्जाची आक्षेपार्ह गलिच्छ भाषा वापरण्यात आलेली आहे”, असं तक्रारीत म्हटलं आहे.
नारायण राणे यांच्यावर टीका –
“नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचे सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रदेखील विचारत नाही. शिवसेनेने काही केले नाही, असे नारायण राणे म्हणतात. मग मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला माणूस तू काय म्हशी भादरत होतास का?” अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडले. यावेळी नितेश राणेंचा एकेरी उल्लेख करत भास्कर जाधव यांनी टोला लगावला आहे. “काल नितेश राणे चिपळूणमध्ये बोलताना माझ्यावर मनसोक्त टीका करून शेवटी म्हणतो ‘माझं एवढं भाषण ऐकल्यानंतर मी लिहून देतो भास्कर जाधव घरातून बाहेर पडणार नाही, घरात लपून बसेल’. मग आज इथे आलेली ही काय तुमची औलाद आहे का?” असं भास्कर जाधव म्हणाले होते.
“नारायण राणे देशाचे मंत्री पण गल्लीत त्यांना कुणी विचारत नाही, उद्धव ठाकरे तर राणेंचं कधी नावही घेत नाही. पण ठाकरेंची सभा पार पडली रे पडली, की राणेंनी प्रेस घेतलीच म्हणून समजा, एवढी कोंडबीचोराची वाईट अवस्था झालीय”, अशा शब्दात भास्कर जाधवांनी राणेंची खिल्ली उडवली.
महत्वाच्या बातम्या :
- Nitesh Rane । “भास्कर जाधव खरंच शिक्षकाचे पुत्र आहेत का, हा संशोधनाचा विषय”; नितेश राणेंचा पलटवार
- Kishori Pednekar । “कुणाच्या कळा, कुणाचं बाळंतपण…”; किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर घणाघात
- Bhaskar Jadhav । “मग तू काय म्हशी भादरत होतास?”; भास्कर जाधवांचा राणेंवर घणाघात
- Blood Donation Benifits | रक्तदान केल्याने शरीराला मिळतील ‘हे’ फायदे
- Bhaskar Jadhav । “शिवसेनेने काही केले नाही, मग तू काय म्हशी भादरत होतास?”; भास्कर जाधवांचा राणेंवर निशाणा