fbpx

मुंडेंच्या बदलीचा जल्लोष महापौरांना भोवणार , न्यायालयाचा अवमान झाल्याची पोलिसात तक्रार

tukaram-mundhe-

टीम महाराष्ट्र देशा : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना बदलीचे पत्र मिळताच त्यांनी आपले आयुक्त कार्यालय सोडले. मुंढेंनी आयुक्त कार्यालय सोडल्याची बातमी कळताच, नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या बंगल्याबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी महापौर रंजना भानसी यांच्या रामायण या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला.मात्र, आता कार्यकर्त्यांचया या आतातायीपणामुळे महापौर रंजना भानसी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात रंजना भानसी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे.

महापौरांच्या या कृतीविरुद्ध मुंढे समर्थक एकवटले आहेत. मुंढे समर्थकांनी महापौर रंजना भानसी यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दुपारी 12 ते 1 या वेळेत फटाके फोडून महापौरांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच मुंढे समर्थकांनी नाशिक महापालिकेसमोर भाजपविरुद्ध घोषणाबाजी केली.