बाजारात इलेक्ट्रीक कार्सची स्पर्धा; टेस्लाच्या कारला ‘ही’ कंपनी देणार टक्कर

टेस्ला

नवी दिल्लीः देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती यामुळे अनेक वाहन धारक अगोदरच त्रस्त झालेले असताना नवीन वाहन खरेदी करणारे ग्राहक देखील इंधन दरवाढीमुळे वाहन खरेदी करण्याकडे कल कमी ठेवतात. मात्र इलेक्ट्रॉनिक वाहनं यावर एक मोठा पर्याय म्हणून समोर येत आहेत.

प्रदूषण आणि इंधन दरवाढ यामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांचा मध्य मार्ग सर्वांसाठीच सोयीस्कर असल्याचं सरकारकडून देखील वेळोवेळी सांगण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या किंमती जास्त आणि चार्जिंग हा मोठा प्रश्न असल्याने ग्राहक ही वाहने खरेदी करण्याकडे जात नाहीत. यामध्ये कमीत कमी किमतीमध्ये वाहन निर्मिती करण्याची तयारीदेखील वाहन उद्योग आणि दर्शवली आहे.

दरम्यान सध्या बाजारात अनेक इलेक्ट्रॉनिक कार येत असून एलन मस्कची टेस्लाला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाची नंबर २ ऑटोमेकर कंपनी किआने आपली नवीन इलेक्ट्रिक कारचा खुलासा केला आहे. या इलेक्ट्रिक कारचे नाव EV6 आहे. जी कंपनीची पहिली इलेक्ट्रिक मॉडल आहे. या कारचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे ही कार सिंगल चार्जवर ५०० किलोमीटर पर्यंत चालते.

EV6 ची किंमत ४० हजार डॉलर पासून ४८ हजार डॉलर पर्यंत जाऊ शकते. ऑनलाइन प्रीमियर वर्ल्ड इव्हेंट मध्ये दक्षिण कोरियाची नंबर २ ऑटोमेकरने या क्रॉसओव्हर ईव्ही६ चा खुलासा केला आहे. जो ह्युंदाई मोटर ग्रुपच्या इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे केला. ही कार या वर्षीच्या अखेरपर्यंत लाँच केले जाऊ शकते. यामध्ये ग्राहकांना गाड़ी 4680 mm लांबी, 1880mm रुंदी आणि 1550mm उंची आहे. किआ ईवी6 ला दोन बॅटरी पॅक ऑप्शन मध्ये विकला जाणार आहे. ज्यात 58kWh आणि 77.4kWh चा समावेश आहे. या बॅटरीच्या मदतीने ईवी केवळ ३.५ सेकंदात शून्य ते १०० किलोमीटर प्रति वेग पकडू शकते. केबिनमध्ये सर्वात जास्त स्पेस सोबत दमदार फीचर्स मिळणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :